पध्दतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम. मतदार जागृती स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचे आवाहन. 15 सप्टेंबर स्पर्धेत सहभाग होण्याची अंतिम तारीख




पध्दतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम

मतदार जागृती स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचे आवाहन

15 सप्टेंबर स्पर्धेत सहभाग होण्याची अंतिम तारीख

       वाशिम, दि. 08 (जिमाका)  पध्दतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीकरीता मास मिडीया आणि सर्वच प्रकारच्या सर्जनशील कलांचे शिक्षण देणारी कला शिक्षण महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती मतांची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. विविध विषयावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पारीतोषीकांची रक्कम निश्चित केली आहे. पोस्टर निर्मिती स्पर्धा - प्रथम पारीतोषीक 50 हजार रुपये, व्दितीय पारीतोषीक 25 हजार रुपये आणि तृतीय पारीतोषीक 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारीतोषीके प्रत्येकी 5 हजार रुपयांचे आहे. घोषवाक्य लेखन स्पर्धा- प्रथम पारीतोषीक 25 हजार रुपये, व्दितीय पारीतोषीक 15 हजार रुपये आणि तृतीय पारीतोषीक 10 हजार रुपये. दोन उत्तेजनार्थ पारीतोषीके प्रत्येकी 5 हजार रुपयांचे आहे. जाहिरात निर्मिती स्पर्धा - प्रथम पारीतोषीक 1 लक्ष रुपये, व्दितीय पारीतोषीक 75 हजार रुपये, तृतीय पारीतोषीक 50 हजार रुपये असून यात दोन उत्तेजनार्थ पारीतोषीके प्रत्येकी 10 हजार रुपयांची आहे.

          या तीनही स्पर्धेसाठी युवा वर्ग आणि मताधिकार, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका व जबाबदारी आणि लोकशाहीतील सर्वसमावेषकता आणि मताधिकार याप्रमाणे विषय देण्यात आलेले आहेत.

      या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियमावली व पारीतोषिकाबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/cmopetitions.aspx या लिंकवर माहिती उपलब्ध आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून मतदार जनजागृती करीता आपले योगदान दयावे. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश