कुपटा येथे आयुष्यमान भव मोहिमेचे उद्घाटन



कुपटा येथे आयुष्यमान भव मोहिमेचे उद्घाटन

 वाशिम दि.१३( जिमाका) मानोरा तालुक्यातील कुपटा येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात आज १३ सप्टेंबर रोजी आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनील कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश परभणकर,क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुईकर यांच्या मार्गदर्शनात मोहिमेचे उद्घाटन कुपटाचे सरपंच पंकज वाळके यांनी केले. 
               यावेळी कुपटाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.शुभांगी जाधव यांनी या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच अवयवदानबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली.वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्पित भगत यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तसेच संशयित क्षयरुग्णांची एक्स - रे तपासणी करण्यात आली.वैभव रोडे यांनी ५१ संशयित क्षयरुग्णाची तपासणी केली.औषधी निर्माण अधिकारी श्री.बागडे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.राठोड,आरोग्य सहायिका श्रीमती पवार,आरोग्य सेवक श्री. राठोड,श्री.मुसळे,श्री.वराडे,श्रीमती बेलखेडे,श्रीमती शेजुळकर, गतप्रवर्तक नजराणा परवीन,डेटा एन्ट्री ऑपरेटर अमोल बोरकर,श्री.खंडारे, परिचर श्रीमती कोकरे,वाहनचालक आशिष चावके,एक्स रे वाहनचालक गणेश राऊत,यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
             प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील आशा सेविका,गावातील नागरिक,रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी लाभार्थीना प्रोटीन पावडर देण्यात आली.५० संशयितांचे स्पुटम घेण्यात आले.
श्रीरंग कानडे व रामदास गवई यांनी रुग्ण तपासणीसाठी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे