आकांक्षित तालुका कार्यक्रम मालेगाव तालुक्यात उत्साहात ग्रामपंचायत सदस्य,बचतगट महिला, ग्रामस्थ ऑनलाईन उदघाटन सोहळ्यात सहभागी
आकांक्षित तालुका कार्यक्रम
मालेगाव तालुक्यात उत्साहात
ग्रामपंचायत सदस्य,बचतगट महिला, ग्रामस्थ ऑनलाईन उदघाटन सोहळ्यात सहभागी
वाशिम दि,30 (जिमाका) आकांक्षित तालुका कार्यक्रम (Aspirational Block Programme ) हा देशात केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत देशात एकूण 500 पंचायत समित्यांमध्ये राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याची आकांक्षित तालुका म्हणून निवड करण्यात आली आहे. 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान या कार्यक्रमांतर्गत संकल्प सप्ताह राबविला जाणार आहे.या संकल्प सप्ताहाचे उदघाटन आज 30 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले.
या उदघाटन सोहळ्यासाठी देशभरातून 3000 अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,मालेगाव पंचायत समितीच्या सभापती रंजना काळे,मालेगाव गट विकास अधिकारी कैलास घुगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष बोरसे व विस्तार अधिकारी सांख्यिकी स्वप्नील खंडारे यांची उपस्थिती होती.
मालेगाव पंचायत समिती येथुन या कार्यक्रमात सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमुख लोखंडे,विस्तार अधिकारी (पंचायत) वाय.वाय पळसकर, ग्रामसेवक आत्माराम नवघरे, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर देशमुख,कर्मचारी व्ही.एन.गुडधे,आर.जी.चौधरी,पी.एस पाणनिस,एस.बी.बाविस्कर,आर.बी देशमुख,पी.डी कडूडोनकर,पी.डी देशमुख,एम.डी.पाटील,ज्ञानेश्वर महाले अंकुश उलेमाले,विकास लांडकर व सुधीर कायापलवाड हे सहभागी झाले होते
जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याची आकांक्षित तालुका म्हणून निवड झाली आहे.या तालुक्यातून अनेक ग्रामपंचायत सदस्य,बचत गट महिला,ग्रामस्थ ग्रामपंचायतमधून थेट ऑनलाईन उदघाटन सोहळ्यास उपस्थित होते.
Comments
Post a Comment