गणेशोत्सव काळात चार दिवस मद्यविक्री दुकाने बंद
- Get link
- X
- Other Apps
गणेशोत्सव काळात
चार दिवस मद्यविक्री दुकाने बंद
वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हयात १९ सप्टेंबर रोजी शहरी व ग्रामीण भागात श्री.गणेश स्थापना होत आहे. स्थापना झालेल्या श्री.गणेशाचे विसर्जन २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मिरवणुका काढून करण्यात येणार आहे. या कालावधीत श्री.स्थापना व विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने अंमली पदार्थाच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर रोजी श्री.गणपती स्थापनाच्या दिवशी व २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी संपुर्ण दिवस जिल्हयात मद्यविक्रीची परवाना असलेली दुकाने बंद राहणार आहे. २९ सप्टेंबर रोजी संपुर्ण दिवस मालेगांव, मंगरुळपीर व मानोरा या पोलीस स्टेशन हद्दीतील आणि ३० सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन कालावधीत संपुर्ण दिवस कामरगांव, शेलुबाजार व अनसिंग या पोलीस स्टेशन हद्दीतील मद्यविक्रीची परवाना दुकाने बंद राहणार आहे.
सर्व परवानाधारकांनी वरील कालावधीत मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवावी. या आदेशाचे पालन करण्यात यावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मद्यविक्री दुकाने परवानाधारकांच्या नावे असलेला परवाना मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ व ५६ नुसार तात्काळ रद्द करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी काढलेल्या आदेशात नमुद केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment