मराठा समाजातील युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ**जिल्ह्यातील ३१९ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी १८ कोटी ८६ लक्ष रुपये कर्ज वाटप*
*मराठा समाजातील युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ*
*जिल्ह्यातील ३१९ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी १८ कोटी ८६ लक्ष रुपये कर्ज वाटप*
वाशिम दि.१३ (जिमाका) मराठा समाजातील बेरोजगार युवक युवती उद्योग/व्यवसायातून स्वावलंबी व्हावे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात.यामाध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेचा परतावा महामंडळ करते.
मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासाला महामंडळाच्या योजनेअंतर्गत या घटकातील युवक-युवतीना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास कर्जदार युवका-युवतींनी उद्योगासाठी घेतलेले व्याज महामंडळ भरते.यामुळे व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो.मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येते.
जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत ८५४ अर्ज प्राप्त झाले.यापैकी ३१९ लाभार्थ्यांना विविध बँकांमार्फत १८ कोटी ८६ लक्ष ९९ हजार ३९ रुपये कर्ज वाटप करण्यात आले.त्यापैकी २ कोटी ४८ लक्ष १५ हजार रुपये आजपर्यंत व्याजाचा परतावा करण्यात आला.
अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे राबविण्यात आलेल्या या योजनेतून मराठा समाजातील नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या कर्जाच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसाय, दुग्ध व्यवसाय,शेळीपालन, व्यवसायिक वाहने,मेडिकल, कृषी सेवा केंद्र,हॉटेल मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर, किराणा दुकान, फुटवेअर, टेलरिंग दूकान, मेडीकल असे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केले आहे.
Comments
Post a Comment