सोयाबीनवरील करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनो फवारणी करा कृषी विभागाचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
सोयाबीनवरील करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
शेतकऱ्यांनो फवारणी करा
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हयात खरीप हंगामात एकुण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबिन पिकांची पेरणी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊसात खंड पडल्यामुळे पिक फुलोरा अवस्था ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना काही प्रमाणात पिकावर विपरीत परिणाम झाला. ज्या शेतकऱ्यांकडे ओलीताची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी पिकास पाणी दिले.
या आठवडयात चांगला पाऊस झाल्याने पिक परिस्थितीत सुधारणा होत आहे. परंतू काही ठिकाणी सोयाबिनवर शेंगावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. शेंगा व खोडावरील करपा रोग हा मुख्यत: बुरशीजन्ये असून Diaporthe phaseolorumvar sogae या बुरशीमुळे होतो किंवा इतरही बुरशीमुळे होतो. या रोगामुळे खोड व शेंगा काळया पडतात. दाणे भरण्याऐवजी ते बारीक होऊन शेंगा वाळतात त्यामुळे पिकांचे नुकसान होते.
या रोगाचे नियंत्रणाकरीता टेबुकोनॅझोल १० टक्के, सल्फर १० टक्के २५ ग्रॅम, १० लिटर पाणी किंवा प्ल्युक्झापायरोझाड १.६७ आणि पायरोक्लोयस्ट्रॉबिन ३.३३ टक्के ६ मिली १० लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकरी आरीफ शाह यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment