19 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
- Get link
- X
- Other Apps
19 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम, दि. 05 (जिमाका) : 6 सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी, 7 सप्टेंबर रोजी दहीहंडी सण साजरा करण्यात येणार आहे. 11 सप्टेंबर रोजी श्रावण महिन्याच्या शेवटचा सोमवार असल्याने या दिवशी जिल्याहयात ठिकठिकाणी कावड यात्रा काढण्यात येतात. 14 सप्टेंबर रोजी पोळा आणि 15 सप्टेंबर रोजी पोळा कर साजरा करण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी श्री गणपती स्थापना होऊन गणेशोत्सवला सुरुवात होत आहे. सद्यस्थितीत जालना येथील घटनेच्या निषेधार्थ जिल्हयात विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्हयात विविध पक्ष/संघटना/सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या मागण्याकरीता धरणे आंदोलने/ उपोषणे करण्यात येत आहेत.
जिल्हा हा सण-उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. वरील काळात जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे याकरीता 5 सप्टेंतर ते 19 सप्टेंबरपर्यंत संपुर्ण जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहे.
हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नसल्याचे जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आदेशात नमूद केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment