लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव पार्श्वभुमीवर जनावरांचे बाजार व वाहतुक बंद ..जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..म्हैस व शेळ्यामेंढ्यांचे बाजार सुरू राहणार



लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव पार्श्वभुमीवर

जनावरांचे बाजार व वाहतुक बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

म्हैस व शेळ्यामेंढ्यांचे बाजार सुरू राहणार

        वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हयातील सर्व सहा तालुक्यातील ३३ ईपी सेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लम्पी चर्मरोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी जिल्हयात जवळच्या जिल्हयातून होणाऱ्या वाहतुकीमुळे इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

             जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार आपल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील सर्व सहाही तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाच्या खरेदी विक्रीचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. लम्पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाची लागण म्हैसवर्ग,शेळी व मेढयांमध्ये होत नसल्याने त्यांच्या खरेदी विक्रीचे बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहतील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा बुवनेश्वरी एस. यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे