वाशिम शहरात अमृत कलश यात्रा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांची उपस्थिती


वाशिम शहरात अमृत कलश यात्रा 
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांची उपस्थिती

वाशिम दि.19 (जिमाका) " माझी माती माझा देश " अभियानातंर्गत आज 19 सप्टेंबर रोजी नगर परिषद,वाशिमच्या वतीने शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड,सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,निवासी नायब तहसीलदार साहेबराव नपते व नगर परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
                    जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी या मातीला नमन करून देशासाठी लढणाऱ्या वीरांना वंदन केले.हे अभियान देशासाठी आपले जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांसाठी समर्पित असल्याची भावना व्यक्त करून या अभियानात शहरातील प्रत्येक वार्डातील प्रत्येक नागरिकांनी योगदान दयावे.तसेच शहरातील प्रत्येक वार्डातून अमृत कलश यात्रेचे आयोजन नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी करावे. शहरातील प्रत्येक कुटूंबांनी अमृत कलशामध्ये मुठभर माती व मूठभर तांदुळ गोळा करण्यासाठी आपले योगदान दयावे.असे श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या. 
                  शहरातून काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेत शहरातील नागरिक,नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी,नगरपरिषदेच्या शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.चौकाचौकात अमृत कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर