मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिद्ध सात दिवसात आक्षेप मागविले


मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिद्ध 
सात दिवसात आक्षेप मागविले 

वाशिम दि.22 (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 33 - रिसोड,34 - वाशिम आणि 35 - कारंजा विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यात आली आहे. 
                    मतदार संख्येत वाढ झाल्याने वाढीव मतदार संख्येच्या अनुषंगाने 1500 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदार केंद्राच्या बाबतीत मतदार केंद्राचे विभाजन करून अथवा मतदार इतर मतदान केंद्रांना जोडून नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल झाले आहे.मतदान केंद्राची प्रारुप यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसेच संबंधित मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर 22 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.   
               मतदान केंद्राच्या प्रारूप यादीच्या बाबतीत कोणाचेही कोणतेही आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत सादर करावे.असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप