विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार योजना




विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या

माजी सैनिक,पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार योजना

       वाशिम, दि. 04 (जिमाका)  जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या (खेळात/ साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला/ नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी/ यशस्वी उद्योजक/सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारे) माजी सैनिक/पत्नी  व पाल्य तसेच शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षात इयत्ता १० वी व १२ वी मध्ये बोर्डात ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी,आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

           तरी विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक/पत्नी व पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसाठी २० सप्टेंबर २०२३ पूर्वी संपर्क साधावा. येतांना आपल्यासोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रीकेची छायांकित प्रत, चालू वर्षात शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत व राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र आणावे. या संधीचा जास्तीत जास्त लाभ माजी सैनिकांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे