दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ दया जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे शिबीर




दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी

दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ दया

                                                                  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे शिबीर

       वाशिम, दि. 18 (जिमाका) दिव्यांग बांधव हे समाजाचे महत्वाचे घटक आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ दयावा. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.

           आज 18 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथील रिसोड रोडवरील तिरुपती लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीराच्या तयारीचा आढावा घेतांना श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, पशुसंवर्ध विभागाचे उपआयुक्त डॉ. श्याम गोरे, नगर  पालिकचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड, श्री. सोनवणे, श्री. शेवदा यांची प्रमुख उपस्थिती होती.

           श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, दिव्यांगांना या अभियानाअंतर्गत शिबीरातून लाभ देण्याचे आतापासूनच सर्व विभागानी नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी सर्व दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना कोणत्या योजनांचा लाभ पाहिजे याची माहिती घ्यावी. त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे याबातची माहिती त्यांनी दयावी. दिव्यांगांना लाभ देण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी जवळपास 50 विभागाने आपले स्टॉल लावावे. रमाई आवास योजना व अन्य आवास योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुलाच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. प्रत्येक विभागाने मुख्य कार्यक्रमातून मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करावा. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मंचावर दिव्यांग बांधवांना जाण्यायेण्यासाठी रॅमची व्यवस्था दोन्ही बाजूला करावी. दिव्यांग बांधवांना रिसोड रोडवरील तिरुपती लॉन येथील कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी बसस्थानकावरुन वाहनाची व्यवस्था करावी. असे त्या म्हणाल्या.

           दिव्यांगाच्या तक्रारीची वेळील दखल घेवून त्याची सोडवणूक तातडीने करावी असे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, शिबीराच्या दिवशी विविध विभागाने स्टॉल लावून आपला सक्षम कर्मचारी त्या स्टॉलवर उपस्थित ठेवावा त्यामुळे स्टॉलला भेट देणाऱ्या दिव्यांग बांधवांना विविध योजनेची व्यवस्थीत माहिती घेता येईल. तसेच स्टॉलवर विभागने विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यासाठी लॅपटॉपची व्यवस्था करावी. त्यामुळे एखाद्या दिव्यांग लाभार्थ्याला तेथेच योजनांचा अर्ज ऑनलाईन भरणे सोयीचे होईल. 3 हजारपेक्षा जास्त दिव्यांग बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासोबतच त्यांना कोणतीही अडचण जाणार नाही याची दक्षता घ्यावी. नगर परिषदेने दिव्यांग लाभार्थ्यांना शिबीरातून मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करावे. असेही त्या यावेळी म्हणाल्या.

         श्री. वाठ यांनी या अभियानाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीराच्या तयारीची माहिती यावेळी दिली. सभेला विविध विभागाचे कार्यालय प्रमुख तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे