आयुष्मान भव कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप




आयुष्मान भव कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते

क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

       वाशिम, दि. 18 (जिमाका)  आयुष्यमान भव या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे उद्घाटन 13 सप्टेंबर रोजी वाशिम येथे आमदार लखन मलिक व आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनील कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश परभणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नि:क्षय मित्र व टी.बी.चॅम्पियन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपचारावरील क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी स्वयंस्फूर्तीने नि:क्षय मित्र बनण्याचे जिल्ह्यातील जनतेला व सामाजिक संस्थांना आवाहन केले. जेणेकरून जिल्ह्यातील सर्व उपचारावरील क्षयरुग्ण पोषण आहारापासून वंचित राहणार नाही.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे