माजी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर योजनेचा अर्ज भरले असल्यास त्याची रक्कम 30 दिवसात प्राप्त करुन घ्यावी शासकीय तंत्रनिकेतनचे आवाहन




माजी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर योजनेचा अर्ज भरले असल्यास

त्याची रक्कम 30 दिवसात प्राप्त करुन घ्यावी

शासकीय तंत्रनिकेतनचे आवाहन 

       वाशिम, दि. 26 (जिमाका) वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक वर्ष सन 2009-10 पासून ते 2013-14 पर्यंतच्या माजी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचा, फ्रिशिप व विद्यावेतनचा अर्ज सादर केला होता व शिष्यवृत्ती, फिशिप व विद्यावेतनची रक्कम घेऊन गेलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी ही रक्कम संस्थेतून 30 दिवसाच्या आत रोखपाल, शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम यांचेकडे विहीत नमुन्यातील पावती सादर करुन रक्कम प्राप्त करुन घ्यावी. विहीत मुदतीत विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, फ्रिशिप व विद्यावेतनची रक्कम घेऊन न गेल्यास त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील अन्यथा ही रक्कम शासन जमा करण्यात येईल. असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम यांनी कळविले आहे. 

*******


Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित