4 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
- Get link
- X
- Other Apps
4 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम, दि. 20 (जिमाका) : जिल्हा जातीय व राजकीयदृष्टया संवेदनशील आहे. सामाजिक माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी वेगवेगळया कारणावरुन जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सद्यस्थितीत जालना घटनेच्या निषेधार्थ जिल्हयात विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्हयात 19 सप्टेंबर रोजी श्री. गणेश स्थापना झाली असून स्थापन केलेल्या श्री. गणेश मुर्तीचे 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच 28 सप्टेंबर रोजी चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे पुढे मुस्लीम धर्मियांचे ईद-ए मिलाद मुहम्मद पैगंबर जयंती उत्सवानिमित्त शहरी व ग्रामीण भागात मिरवणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सण-उत्सव काळात एखाद्या व्यक्तीकडून समाज माध्यमात आक्षेपार्ह संदेश/ व्हिडीओ प्रसारीत झाल्यास जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये व जिल्हयात शांतता अबाधित राहावी, यासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी लागू केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमुद केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment