वाशिमच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रक्तदान शिबिर
- Get link
- X
- Other Apps
वाशिमच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रक्तदान शिबिर
वाशिम, दि. 01 (जिमाका) : शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी वाशिम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सामाजिक जाणीवेतून वाशिम शासकीय तंत्र निकेतन येथील अधिकारी कर्मचारी विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
शिबिराच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ.बी.जी.गवलवाड यांनी आपण स्वतः रक्तदान केल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचवू शकतो. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे असे सांगितले. डॉ. मुंडे व श्री दंडे यांनी रक्तदानामुळे होणारे फायदे व महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे प्राचार्य बी.जी. गवलवाड, ए.डी.ढोले, एनएसएसचे समन्वयक यु.ए.नागे, बी.बी. लव्हाळे, डॉ.आर.जी. बिलोलीकर, सी.डी घुगरे, एम.एस. हुले, व्ही.एस. जोशी, एम.डी. मोरे, आर.आर. अढाव, आर.पी. वानखेडे व जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मुंडे, एस.बी. डाखोरे (रक्तपेढी वैज्ञानिक) श्री. कल्याणकर, एस.के दंडे, देवाशिष धडे, श्री. काळे, श्री. ढोके व संस्थेमधील विद्यार्थी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी एनएसएसचे समन्वयक, विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment