मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या समृद्धी महामार्गाची पाहणी करणार*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या समृद्धी महामार्गाची पाहणी करणार* 

वाशिम दि ३ (जिमाका) ११ डिसेंबर रोजीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा दौरा लक्षात घेता उद्या ४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर ते शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
     उद्या सकाळी ९.४५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी ते भेट देऊन १०.३० वाजता समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स (महामार्गाचे सुरुवातीचे ठिकाण) येथून ते प्रवासाला सुरुवात करतील. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा प्रवास मुख्यमंत्री उद्या करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री शिंदे शिर्डी येथे पोहोचतील.शिर्डी विमानतळावरून ते नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.
        समृद्धी महामार्ग हा एकूण ७०१ किमीचा लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग  नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा महामार्ग असून यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतीमान होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे