लाभार्थ्यांनो ! निराधार योजनेच्या अनुदानासाठी कागदपत्रे स्वत: सादर करा दलालांवर होणार कारवाई तहसीलदार बंडगर यांचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
लाभार्थ्यांनो ! निराधार योजनेच्या अनुदानासाठी कागदपत्रे स्वत: सादर करा
दलालांवर होणार कारवाई
तहसीलदार बंडगर यांचे आवाहन
वाशिम, दि. 05 (जिमाका) : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अंध, अंपग, मनोरुग्ण, विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत महिला, दुर्धर आजारग्रस्त तसेच श्रावणबाळ योजनेच्या ज्या निराश्रीत वयोवृध्द लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला तसेच याकरीता लागणारे मुळ कागदपत्रे सादर केली नसल्याने त्या लाभार्थ्यांचे मानधन सुरु झाले नाही. अशा लाभार्थ्यांनी संजय गांधी योजना विभागात स्वता कागदपत्रे सादर करावीत. कागदपत्रे सादर करण्यासाठी दलालांची मदत घेऊ नये. यापूर्वी कागदपत्रे सादर केली असल्यास त्यांनी पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.
कागदपत्रे सादर करतेवेळी लाभार्थ्यांनी चालु वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मुळ प्रत व आधार कार्ड, जन्माचा पुरावा, टि.सी, अंपगाचे प्रमाणपत्र, मृत्यु दाखला, दुर्धर आजाराचे मुळ प्रमाणपत्र,घटस्फोटीत असल्यास न्यायालयीन पुरावा, रहिवाशी दाखला, विधवा महिलांकरीता मुलांच्या वयाचे पुरावे आधार कार्ड व जन्माचे दाखले किंवा बोनाफाईड आदी कागदपत्रे संबंधीत शाखेमध्ये प्रत्यक्ष लाभार्थ्यांनीच सादर करावीत. इतर व्यक्तींकडे कागदपत्रे देवु नयेत. दलालामार्फत कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत.
ज्या लाभार्थ्यांची मुले नोकरीवर असतील किंवा व्यापार करीत असतील अशा लाभार्थ्यांनी स्वत:हून कार्यालयास त्याबाबत अवगत करावे. जर ही माहिती लाभार्थ्यांनी स्वत:हून पुरविली नाही, तर अशा लाभार्थ्यांवर तसेच त्यांचे मुलांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल. आजपर्यंतची मानधनाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल.
या शिवाय मानधन सुरु करण्याकरीता कोणत्याही दलालांमार्फत कागदपत्रे सादर करु नये किंवा कोणत्याही दलालांना पैसे देवुन स्वतःची फसवणुक करुन घेवु नये, पगार सुरु करण्याकरीता खोटी कागदपत्रे तयार करुन घेवू नये, असे कोणी आपणास करुन देत असल्यास त्या दलालांचे नाव तहसिल कार्यालयास कळविण्यात यावे. जेणेकरुन अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे मंगरूळपीरच्या तहसिलदार शितल बंडगर यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment