विधी स्वयंसेवकासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित




विधी स्वयंसेवकासाठी

 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

वाशिम, दि. 16 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम येथे 50 विधी स्वयंसेवक आणि तालुका विधी सेवा समिती मंगरुळपीर, मालेगांव, मानोरा, कारंजा व रिसोड येथे प्रत्येकी 25 विधी स्वयंसेवकांची एक वर्षाकरीता राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या नियमानुसार ज्या दिवशी काम करेल त्या दिवशीच्या मानधनावर नियुक्ती करावयाची आहे.

याबाबत अटी शर्तीसह अर्जाचा नमुना उपलब्ध करुन घेण्यासाठी जिल्हा न्यायालय, वाशिम यांच्या https://districts.ecourts.gov.in/washim या संकेतस्थळाला भेट दयावी. अर्ज 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम यांच्याकडे प्रत्यक्षरित्या सादर करावे. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर