सामाजिक न्याय पर्वानिमित्त तृतियपंथी नोंदणी, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिस वितरण




              सामाजिक न्याय पर्वानिनिमित्त

तृतियपंथी नोंदणी, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिस वितरण

      वाशिम, दि. 06 (जिमाका) : 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत साजरे करण्यात येणाऱ्या सामाजिक न्याय पर्वानिमित्त ‍ 5 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांचे संयुक्त वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे जिल्हास्तरीय तृतीयपंथीयांसाठी नोंदणी व जनजागृती शिबीराचे तसेच सशक्त भारतासाठी भारतीय संविधानाची भूमिका व अधिक सशक्त भारतासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावरील जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

        उदघाटक म्हणून बोलतांना श्री. वाठ म्हणाले, तृतीयपंथी हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. त्याची सर्वांगिण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. या समाज घटकांच्या मूलभूत अधिकारांचे शासनाकडून संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नॅशनल पोर्टल ऑफ ट्रांसजेंडर हे तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हयातील तृतीयपंथीयांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री वाठ यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.

        श्री. वाठ पुढे म्हणाले, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषीक व प्रमाणपत्रामुळे प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.  

        शिबीराकरीता मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथी पायल भुरके व मानोरा येथील प्रविण कानडे उपस्थित होते. यावेळी त्यांची नोंदणी करण्यात आली. जिल्हयातील सर्व तृतीयपंथीयांना आपली प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. जिल्हयातील पदवीधर तृतीयपंथी यांनी पदवीधर मतदारसंघामध्ये नोंदणी करण्याबाबत तसेच तृतीयपंथीयांनी मतदार यादीमध्ये नोंदणी करण्याबाबत सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.

        “ सशक्त भारतासाठी  भारतीय संविधानाची भूमिका व अधिक सशक्त भारतासाठी करावयाच्या उपाययोजना ” या विषयावरील जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच चित्रकला स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. मान्यवरांनी प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन केले.

          विजेत्या विद्यार्थ्यांपैकी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम वाशिम येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहातील आचल बर्गी, व्दितीय राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील अर्चना कर्डीले व तृतीय राजस्थान आर्य कॉलेजमधील अनित्य तायडे यांना तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निवासी मुकबधीर विद्यालय, अनसिंग येथील विद्यार्थी कृष्णा गरड, द्वितीय क्रमांक नवनाथ चव्हाण, आधार निवासी मतीमंद विद्यालय, कवठा येथील विद्यार्थी सखाराम दिवेकर व प्रोत्साहनपर पारितोषीक सुरेश कारडे यांना देण्यात आले.

           सामाजिक न्याय विभागाअंतर्गत “ संविधान जागर ” या कार्यक्रमातून श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. भदरगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये संविधानाबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विधी अधिकारी के. पी. राऊत, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती ए. ए. राऊत, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल एस. एस. इंगोले, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती वर्षा लाकडे, समाज कल्याण निरीक्षक ए. बी. चव्हाण, एस. एम. निमन, विजय भगत, आर. टी. चव्हाण, पी. ए. गवळी, जी. एम. उगले, व एन. जे. चव्हाण तसेच जिल्हयातील विविध वसतीगृह व शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार समाज कल्याण निरीक्षक संध्या राठोड यांनी मानले. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे