शांताबाई गोटे महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर व चर्चासत्र संपन्न

शांताबाई गोटे महाविद्यालयात

जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर व चर्चासत्र संपन्न

       वाशिम, दि. 07 (जिमाका) : २६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन करण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विशेष मोहिमेव्दारे मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या वतीने मोहिमेचे आयोजन करुन विविध उपक्रम राबविण्यात आले. याच मोहिमेचा एक विशेष भाग म्हणून ३ डिसेंबर रोजी मातोश्री शांताबाई गोटे कनिष्ठ महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.  

          या शिबीरात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, विधी अधिकारी अॅड. किरण राऊत व श्री. गोपाल गणोद यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन केले. संशोधन सहाय्यक मोहन तिडके यांनी पीटीटीद्वारे सादरीकरण केले. शिबीर व चर्चासत्राला महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग आणि १५० पेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ.व्ही.बी.चांदेकर यांनी केले. आभार डॉ.पी.जी.गोटे यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे