एड्स दिनाच्या रॅलीतून जनजागृतीचा संदेश
- Get link
- X
- Other Apps
एड्स दिनाच्या रॅलीतून जनजागृतीचा संदेश
वाशिम, दि. 01 (जिमाका) : जागतिक एड्स दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिमच्या वतीने आज १ डिसेंबर रोजी वाशिम शहरातून एड्सविषयक जनजागृतीकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा न्यायधीश व्हि.के.टेकवानी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देशपांडे व शासकीय नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.परभणकर, मेट्रन श्रीमती चव्हाण, श्रीमती हजारे व श्रीमती खंडारे यांची उपस्थिती होती.
Equalize " "आपली एकता, आपली समानता एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरीता " या घोषवाक्याने वाशिम शहर दुमदुमून गेले. रॅलीचा शुभारंभ जिल्हा रुग्णालयातून करण्यात आला व शहरातील मुख्य चौकांमधुन बसस्थानक मार्गाने जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप झाला. महाविदयालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने विविध पथनाटय व गितांचे आयोजन करण्यात आले. एचआयव्ही/ एडस या माहितीचे हस्तपत्रकांचा व एचआयव्ही प्रतिबंधक निरोध वाटप करण्यात आले. लोककलेच्या माध्यमातुन शाहीर मधुकर गायकवाड यांच्या चमूने पथनाटयाचे सादरीकरण केले. रॅलीमध्ये १ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रॅलीत सहभाग घेतलेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या रॅलीमध्ये श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले महाविद्यालय, श्री शिवाजी विद्यालय व महाविदयालय, सावित्रीबाई फुले नर्सिंग, माँ गंगा नर्सिंग स्कुल, नॅझरीन नर्सेस ट्रेनिंग कॉलेज, मदर टेरेसा नर्सिंग कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, श्री तुळशीरामजी जाधव महाविद्यालय, राजर्षी शाहु नर्सिंग महाविद्यालयाचे विदयार्थी, श्री. गुणवंत शिक्षण संस्था. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक व बहुउददेशिय संस्था, विहान प्रकल्प, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, आकाशवाणी विभाग, स्वयंशासन बहुददेशिय संस्था, श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुददेशिय संस्था आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालये आणि सामजिक संस्था यांचा सहभाग होता.
रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे, डी.आर मनवर, श्री. रत्नपारखी, अनिल राठोड, निलेश अल्लाडा, रामा कांबळे, श्रीमती आगाशे, श्रीमती अवचार, श्रीमती वानखेडे, श्री. मेसरे, श्रीमती मोरे, जिशा वरीद, स्वप्नील सरनाईक, शांताराम गायकवाड,श्री. पंकजकुमार,बाबाराव भगत, शुभम जैन,श्री.खंडारे, जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. तसेच पोलीस प्रशासनाने रॅलीच्या मार्गाचे उत्तम नियोजन करुन सहकार्य केले. जिल्हा क्रीडा अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन समुपदेशक श्री. पंढरी देवळे यांनी केले. आभार श्री. मिलींद घुगे यांनी मानले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment