मतदान केल्यास रुग्णांना मिळणार 50 टक्के सवलत


मतदान केल्यास रुग्णांना मिळणार 50 टक्के सवलत
 
मेडिकल असोसिएशनचा कौतुकास्पद उपक्रम
 
वाशिम,दि.24 (जिमाका) जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना वाशिम मधील सर्व डॉक्टरांकडून
  26, 27 आणि 28 एप्रिल रोजी ओपीडी तपासणी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय IMA ,NIMA, IDA, आणि HIMA असोसिएशनकडून घेण्यात आल्याचे IMA,IDA,NIMA,HIMA च्या अध्यक्षांनी कळविले आहे. 
मतदानाची टक्केवारी वाढावी, शेवटच्या मतदाराने आपला हक्क बजावा या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. याचाच भाग म्हणून IMA,IDA,NIMA,HIMA वाशिम तर्फे मतदान केलेल्या मतदारास ओपीडीच्या फीस मध्ये 50% सवलत देण्याचे ठरविण्यात आले आहे. 
 मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून मतदान करून घेणे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी एलोपैथिक, आयुर्वेदिक,होम्योपैथिक व दंत वैद्यकीय असोसिएशन तर्फे घेण्यात येत असलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन IMA, IDA, NIMA, HIMA वाशिम तर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे