लोकशाहीचा हा उत्सव सगळ्यांनी एकत्र येऊन उत्कृष्टरित्या साजरा करानिवडणूकीदरम्यान आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी एम.मल्लिकार्जुन नायक


लोकशाहीचा हा उत्सव सगळ्यांनी एकत्र येऊन उत्कृष्टरित्या साजरा करा

निवडणूकीदरम्यान आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी
                                                            
         एम.मल्लिकार्जुन नायक

वाशिम,दि.१० (जिमाका ) जिल्ह्यात मतदान टक्केवारी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे त्यासाठी सर्व यंत्रणांनी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विविध माध्यमातून प्रसिद्धी आणि जनजागृती बरोबरच प्रत्येक बि.एल.ओंनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील प्रत्येक मतदारास मतदान करण्यास सांगावे आवश्यक असल्यास व्यक्तिशः त्यांना फोन करावे त्यांना काही अडचणी असल्यास ते समजून घ्याव्या त्यांना मतदान केंद्रापर्यंत ने आण करण्याच्या सुविधा द्याव्यात असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक (सामान्य) एम. मल्लिकार्जुन नायक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रसंगी केले.

 

               यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे ,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, राजेंद्र जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अभिनव बालूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

               भारत निवडणूक आयोगाने एकही मतदार मतदानापर्यंत पासून वंचित राहू नये. अशा सूचना केल्या आहेत, त्यानुसार प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील

बीएलओ व बीडीओ यांना मतदारांना आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदारास मतदानाआधी व मतदानाच्या दिवशी मतदान करण्याबाबत आवाहन करावे. तसेच प्रत्येक बीएलओ यांनी मतदारांना वोटिंग स्लिप देऊन त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या. या कालावधीत गृह मतदानही घेण्याच्या सूचना असल्याने अशा मतदारांना पूर्व सूचना देऊन त्यांचे मतदान करून घ्यावे.असेही ते यावेळी म्हणाले.

 

                 मतदानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना ज्या मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे त्या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्यात, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि वीज कनेक्शन सुरळीत असणे आवश्यक आहे. उन्हाळ्याची तीव्रता पाहता मतदारांसाठी शेड आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असेही श्री नायक म्हणाले.

 

                   निवडणूकीदरम्यान आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध एफआयआर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.विनापरवानगी सभा किंवा जाहिरात, पैशांचे प्रलोभन अथवा दारू आणि इतर साहित्याचे वाटप करणाऱ्यांवर सूक्ष्म नजर ठेवावी अशा सूचनाही श्री नायक यांनी दिल्या.याच कालावधीत रामनवमी आणि पोहरादेवी यात्रेनिमित्त जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील अनेक भाविक पोहरादेवी येथे येणार असून त्यांचेही व्यवस्थित नियोजन करून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. याठिकाणी आवश्यक प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवावा. अवैध दारूचे वितरण होणार नाही याचे सूक्ष्म नियोजन करावे‌. असेही श्री. नायक यावेळी म्हणाले.सर्व यंत्रणांनी हा लोकशाही उत्सव उत्कृष्टरित्या पार पाडावा या दृष्टीने काम करावे असे आवाहन निरीक्षक  एम. मल्लिकार्जुन नायक यांनी केले.

 

          आढावा बैठकीनंतर श्री. नायक यांनी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती कक्ष आणि आचारसंहिता कक्षास भेट देऊन माहिती जाणून घेतली.सभेला विविध विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे