लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई २ लाख १० हजार जप्त



लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई
२ लाख १० हजार जप्त

पिंपळा येथे १ लाख १५ हजार व पन्हाळा चेक पोस्टवर ९५ हजार रोकड जप्त 

वाशिम,दि.१५ (जिमाका) 
१४ एप्रिल रोजी वाशिम तालुक्यातील पन्हाळा फाटा येथे पुसदकडून येणाऱ्या एम एच ३७ व्ही २९११ ब्रिझा वाहनाची तपासणी केली असता ९५ हजार व आज १५ एप्रिल रोजी अमरावतीकडून येणाऱ्या मारोती एस प्रेसो एमएच २७ डीए ३५०६ या वाहनाची
तपासणी केली असता १ लाख १५ हजार रुपये रक्कम आढळून आली. सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावे
आढळले नाही.  उपरोक्त कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम बुवनेश्वरी एस.
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य पथक प्रमुख रवि राठोड व गोपाळ ईढोळे व पथकातील कर्मचारी यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे