पोहरादेवी यात्रेकरीता यंत्रणांनी सज्ज राहावे बुवनेश्वरी एस पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


पोहरादेवी यात्रेकरीता यंत्रणांनी सज्ज राहावे
            बुवनेश्वरी एस 


पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

वाशिम,दि.७ (जिमाका) आगामी रामनवमी निमित्ताने पोहरादेवी येथे यात्रा आयोजित करण्यात येत असून या अनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रणांनी सज्ज राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.
      जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा सभा घेण्यात आली.त्यावेळी त्या बोलत होत्या.

 या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे , कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी कारंजा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रसाद पाटील,
तहसीलदार मानोरा संतोष यावलीकर , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व इतर यंत्रणाचे प्रमुख सभेला उपस्थित होते. 

श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या,
         यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या निगा राखण्याच्या दृष्टिकोनातून, यात्रेच्या परिसरात ठिकठिकाणी स्टॉल उभारून त्या ठिकाणी पथक नेमून आरोग्याच्या सुविधा पुरविण्याबाबत याव्यात.
    पोहरादेवी येथील रामनवमी यात्रेकरिता वेगवेगळ्या भागातून,इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी यात्रेच्या परिसराभोवती वेगवेगळ्या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चेक पोस्टची उभारणी करावी व वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा होऊ नये. त्याकरिता ज्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. त्याच ठिकाणी वाहने उभी करणेबाबत पोलीस विभागांना सूचित केले . 
    पोहरादेवी येथील मंदिराकडे जाणारे विविध रस्त्याची दुरुस्ती करून रस्ते सुरळीत करणेबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच बांधकामाधिन असलेले संत सेवालाल महाराज मंदिर, रामराव बापू समाधी स्थळ, जगदंबा देवी मंदिर परिसर, उमरी येथील सामकी माता मंदिर परिसर, जगदंबा माता मंदिर परिसर, प्रल्हाद महाराज मंदिर परिसर, जेठालाल महाराज मंदिर परिसर आणि उमरी येथील भाविकांसाठी उभारण्यात येत असलेले शेड येथे आवश्यक त्या प्रमाणात बॅराकेटिंग लावण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निर्देश दिले.सोबतच ग्रामपंचायत कार्यालयाचा परिसरात भराव भरून समतोल करण्याच्या सूचना यावेळी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी दिल्या.
     यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी पाहता यात्रे कालावधीत कुठेही घान होणार नाही यादृष्टीने स्वच्छता आणि कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत घंटागाड्या आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये यात्रे दरम्यान कुठेही आग लागण्यासारखी अप्रिय घटना घडल्यास त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आवश्यक त्या प्रमाणात फायर ब्रिगेड च्या गाड्या तैनात ठेवण्याबाबत संबंधित मानोरा नगरपंचायत मुख्याधिकारी सूचना देण्यात आल्या. पोहरादेवी येथे यात्रे दरम्यान फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
  यात्रेमधिल भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधा मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा टँकरद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता मजीप्रा वाशिम व कार्यकारी अभियंता ग्रापापू जि.प.वाशिम यांना देण्यात आल्या. 
 रामनवमी हा सण १७ तारखेचा असून दिनांक १४ पासूनच इतर राज्यातून व महाराष्ट्र मधून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येण्यास सुरुवात होत असल्यामुळे यात्रे दरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत सुरू रहावा व त्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून २४ तास विद्युत पुरवठा सुरू राहील.या पद्धतीने ठीक ठिकाणी पथकांची नियुक्ती करून आवश्यक ते नियोजन करावे. अशा सूचना कार्यकारी अभियंता महावितरणच्या विभाग प्रमुखांना दिल्या.
सदर आढावा सभेला जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

चौकट : दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने मानोरा तालुक्यातील सावळी फाट्यावर उभारण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या चेकपोस्टची जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी पाहणी केली

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे