लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४८ हजार ६३३ पोस्टल बॅलेट पेपर व १ हजार २५३ नमुना १२ हस्तांतरित


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

८ हजार ६३३ पोस्टल बॅलेट पेपर व 
१ हजार २५३ नमुना १२
हस्तांतरित

वाशिम,दि.१५ (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणुक - २०२४ अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तथापी, निवडणूक कामाकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना २६ एप्रिल रोजी मतदार केंद्रावर जावुन प्रत्यक्ष मतदार करणे शक्य नाही अशा सर्वांकडुन
भरण्यात आलेला नमुना १२ व त्यांना पाठविण्यात येणाऱ्या पोस्टल बॅलेट पेपरची देवाण-घेवाण करण्याकरीता सर्व संबंधित सहायक निवडणुक अधिकारी यांचे करीता १४ एप्रिल रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर शिबीराकरीता नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या
जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते व त्यांचेव्दारे एकुण १ हजार २५३ नमुना १२ व एकूण ८ हजार ६३३ पोस्टल बॅलेट पेपर हस्तांतरीत करण्यात आले. आणि पुढील शिबीर १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे.असे 
जिल्हा नोडल अधिकारी टपाली मतपत्रिका 
तथा जिल्हा नियोजन अधिकारी
राजेश सोनखासकर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे