भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात बुवनेश्वरी एस पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
- Get link
- X
- Other Apps
भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
बुवनेश्वरी एस
पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
वाशिम, दि.०१ (जिमाका) : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमी यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आज १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आयोजित सभेत घेतला.
या पूर्वतयारी आढावा सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर,उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, अप्पर पोलीस अधिक्षक भारत तांगडे,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या,यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी समन्वयातून काम करावे. पाण्याची मुबलक उपल्बधता ठेवावी जेणेकरुन नागरिकांची गैरसोय होणार नाही. यात्रेच्या अनुषंगाने अंघोळीसाठी व्यवस्था करण्यात यावी.तसेच महीला भाविकांच्या स्नानासाठी स्वतंत्र स्नानगृहे तयार करावेत. अश्या सुचना संबंधीत यंत्रणेला यावेळी त्यांनी दिल्या.
यात्रेच्या कालावधीत पोहरादेवी येथे आरोग्य विभागाने २४ तास दोन आरोग्य पथके तैनात ठेवावी.दोन रूग्णवाहिका उपलब्ध असाव्यात.पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा.ज्या स्त्रोतामधून पाणी उपलब्ध होणार आहे त्याची तपासणी करण्यात यावी. पाण्यामध्ये ब्लिचींग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. यात्रेदरम्यान २४ तास वीज पुरवठा सुरु ठेवावा. तसेच अनुषंगीक पायाभूत सुविधा पुरवाव्यात.
पोहरादेवीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची तातडीने दूरुस्ती करण्याची कामे संबंधित विभागाने सुरु करावी. असे सांगून श्री.बुवनेश्वरी म्हणाल्या, रस्त्यावर असलेली अतिक्रमणे त्वरीत काढण्यात यावी.यात्रेदरम्यान उघडयावर कोणताही भाविक शौचास जाणार नाही यासाठी तात्पुरती शौचालये सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारावी.कचरा व प्लॅस्टीकची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.पोहरादेवीच्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतींना देख्रील पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. मच्छरांचा प्रतिबंध करण्यासाठी पोहरादेवी येथे फॉगींग मशीन, स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ, अग्नीशमन यंत्रणा व घंटागाडयांची व्यवस्था करण्यात यावी.असे त्या यावेळी म्हणाल्या.
श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, दर्शन घेतांना भाविकांना अडचण निर्माण होणार नाही याकरीता पोलीस विभागाने बॅरीकेटसची व्यवस्था करावी.यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण व सुरक्षेकडे पोलीसांनी लक्ष द्यावे. पोहरादेवीपासून चारही बाजुला बाहेर पार्कीगची व्यवस्था करावी. यात्रेदरम्यान अवैध दारु विक्री, संदेशवहन यंत्रणा व नेटवर्क सेवा विस्कळीत होणार नाही याबाबत संबंधित यंत्रणा दक्ष असावी. उपहारगृहे, खाद्यपदार्थाच्या दुकानांना तात्पुरत्या परवानग्या देतांना यात्रेदरम्यान विषबाधा तसेच अवैध वाहतूक होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.असे त्यांनी संगितले.
यावेळी महंत जितेंद्र महाराज व सुनिल महाराज व शेखर महाराज यांनी यात्रेच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी मांडून त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात.अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment