जेवणात 10 टक्के सवलत - 50 रुपयात चित्रपट - कामगारांना पगारी रजा मतदारांसाठी आयएमकडून रुग्णांना फी सवलतीनंतर विविध आस्थापनांचाही पुढाकार



जेवणात 10 टक्के सवलत - 50 रुपयात चित्रपट - 

कामगारांना पगारी रजा

मतदारांसाठी आयएमकडून रुग्णांना फी सवलतीनंतर विविध आस्थापनांचाही पुढाकार

 वाशिम,दि. 23 (जिमाका ) जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना 26,27 आणि 28 एप्रिल रोजी हॉटेल ईव्हेंटो , दानिश एम्पायर आणि मनीप्रभा येथे 10 टक्के सवलत तसेच एच टू एम सिनेमागृह येथे 50 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. अशच प्रकारे जिल्ह्यातील विविध आस्थापनांनी त्यांच्याकडील कामगारांना मतदान केल्यास पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे मतदान करून आलेल्या मतदारांना 26, 27 आणि 28 एप्रिल रोजी ओपीडी तपासणी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी, शेवटच्या मतदाराने आपला हक्क बजावा या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून मतदान करून घेणे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील प्रतिष्ठित आस्थापनांकडून मतदानास प्रोत्साहन देण्यासाठी केल्या जाणा-या प्रयत्नांना नगरिकांनी मोठया उत्साहात प्रतिसाद देत मतदान करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे