जिल्ह्यात सर्वदूर मतदानाचा जागर मतदार उत्साहित यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात सर्वदूर मतदानाचा जागर

 मतदार उत्साहित 

यंत्रणा सज्ज 

आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी 
        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांसोबत निरनिराळे व आकर्षक उपक्रम

वाशिम,दि.२५ (जिमाका) मतदान प्रक्रिया ही लोकशाहीला परिपक्व करणारी आहे आपले मतदान आपले अधिकार वापरणे हे आपले अस्तित्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे त्यामुळे २६ एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपल्या अधिकार बजावून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे. 

मतदानाचा दिवस हा सण आणि उत्सव सारखा साजरा करावा. प्रत्येका मतदाराने स्वतःही मतदान करावे आणि आपल्या ओळखीतल्या सर्व पात्र मतदारांना मतदान करण्यास प्रेरित करावे असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. 

 जिल्हा प्रशासन या लोकसभा निवडणुकात जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे यापूर्वी गृह मतदानाच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून मतदान करून घेतले तसेच कर्तव्यावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनीही  पोस्टल बॅलेटच्या द्वारे झालेल्या मतदानातून आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. मतदान केंद्र सुसज्ज स्वच्छ सर्व पायाभूत सुविधा युक्त तसेच आकर्षित बनविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन मतदान केंद्रांची सजावट करण्यात आली आहे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदान केंद्रांवर एकी मेस्कॉट या टेडी मॅनसोबत सेल्फी घेण्यासाठी बरेच मतदार उत्सुक आहेत. मतदान केल्यानंतर एकी सोबत सेल्फी, महिला मतदारांच्या हातांवर  मेहंदीचा ठसा तसेच जिल्ह्यातील सात ठिकाणी हॅलोजन बलून ही लावण्यात आले असून यावर मी मतदान करणार हे घोषवाक्य ठळकपणे दिसत आहे. मतदान केंद्र सुंदर व आकर्षक दिसावे यासाठी अनेक  केंद्रांवर महिलांनी सुंदर रांगोळ्या केलेल्या आहेत या रांगोळ्या द्वारे मतदानाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे.

मतदान जनजागृती साठी फक्त शासकीय यंत्रणाच नव्हे तर महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला आहे अनेक शाळांमधून महाविद्यालयांमधून जनजागृती रॅली काढण्यात आली महिलांसाठी त्यांचे मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हाधिकारी यांनी विशेष मोहीम हाती घेऊन विशेष सभा घेतल्या गावागावात जाऊन महिलांचे प्रबोधन केले तसेच २३ एप्रिल रोजी भव्य मानवी साखळी चे आयोजन करून मतदान जनजागृती करण्यात आली.

गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील सर्व यंत्रणा मतदान टक्केवारी वाढी साठी विविध माध्यमातून जनजागृती करत आहे जिल्ह्यातील आशा सेविका अंगणवाडी सेविका हे घरोघरी जाऊन नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करत आहेत ठीक ठिकाणी मतदान जनजागृती पर बॅनर्स लावण्यात आले असून मतदानाचे दिवशी पोलीस नियंत्रण मार्फत ही चूक बंदोबस्त करण्यात आला असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सच सज्ज असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर मतदान केल्यावर रुग्णांना तपासणी फी मध्ये ५०% सवलत शहरातील मोठ्या हॉटेल्स मध्ये जेवणाच्या बिलामध्ये दहा टक्के सवलत तसेच चित्रपट ग्रहांमध्ये फक्त पन्नास रुपये मध्ये चित्रपट पाहण्याची मेजवानी ही विविध आस्थापनांकडून करण्यात आली आहे त्याचबरोबर व्यापारी  संघटनांनी आपल्या आस्थापनेवरील कामगारांना मतदान केल्यास त्या दिवसाची म्हणजेच २६ एप्रिल रोजी मतदान केल्यास पूर्ण दिवसाची पगारी रजा देण्याचेही जाहीर केले आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर हिरकणी कक्ष,स्वच्छ पिण्याचे पाणी, शेड आणि प्रथमोपचार किट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तेव्हा जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने २६ एप्रिल रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या मतदान प्रक्रियेला आपले मत देऊन यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे