१४ व १५ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावाउद्योग व आस्थापना प्रमुखांनी सहभागी व्हावे रिक्त पदांच्या मनुष्यबळासाठी मागणी पत्र सादर करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



१४ व १५ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा

उद्योग व आस्थापना प्रमुखांनी सहभागी व्हावे

रिक्त पदांच्या मनुष्यबळासाठी मागणी पत्र सादर करा

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

       वाशिम, दि. 28 (जिमाका) : कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून " महाराष्ट्र स्टार्टअप, रोजगार उद्योजकता सप्ताह " १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १४ व १५ ऑक्टोबर रोजी वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

         जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाकडून जिल्ह्यातील नोकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नियोक्ते/ आस्थापना प्रमुखांना त्यांच्या आस्थापनातील रिक्त पदांवर मनुष्यबळ घेण्याकरिता मागणी पत्र सादर करावे.

        ज्या उद्योगात किंवा आस्थापनांवर रिक्त पदे आहेत, त्यांच्या प्रमुखांनी मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक/ तांत्रिक पात्रता वयोमर्यादा व मानधन इ. बाबीचा समावेश करून ५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम येथे प्रत्यक्षपणे किंवा washimrojgar@gmail.com याई-मेलवर मागणी पत्र सादर करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे. 

        रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांच्याशी किंवा अतिश घुगे (९४०३८७२२४५), दीपक भोळसे (९७६४७९४०३७) व प्रतीक बाराहाते (९०९६८५५७९८) यांच्याशी संपर्क साधावा.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे