राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान समान व असमान निधीसाठी ग्रंथालयाचे प्रस्ताव मागविले 28 ऑक्टोबर अंतिम मुदत
- Get link
- X
- Other Apps
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान
समान व असमान निधीसाठी ग्रंथालयाचे प्रस्ताव मागविले
28 ऑक्टोबर अंतिम मुदत
वाशिम, दि. 26 (जिमाका) : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातीत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. सन 2022-23 साठी शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.
सन 2022-23 साठीच्या समान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना- या योजनेमध्ये योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनांसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.
असमान निधी योजना सन 2022-23 साठी पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान "ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.
वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment