जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने 
कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न 

वाशिम दि ७(जिमाका) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या वतीने ७सप्टेंबर रोजी राजस्थान आर्य कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथे जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यपद्धती व मार्गदर्शन यावर कार्यशाळा संपन्न झाली.
     या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीसह जात वैधता प्रमाणपत्र वेळेत प्राप्त होण्यासाठी नेमकी कुठले कागदपत्रे व दस्ताऐवज सोबत जोडून प्रस्ताव कशा पद्धतीने सादर करावा याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली.मार्गदर्शन कार्यशाळेत मोहन तिडके यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या माहितीचे सादरीकरण केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना यावेळी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले.
       कार्यशाळेला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी एल बी राऊत, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ छाया कुलाल व डॉ. हेमंत वंजारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एफ.पगारिया होते.  
              कार्यशाळेला यशस्वी आयोजनासाठी गोपाल गणोदे,स्वाती पवार, वैभव घुगे, पंकज ठाकूर,सुमेध खंडारे आदींनी परिश्रम घेतले. या महिन्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिम कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरावर मार्गदर्शन कार्यशाळेचे व ऑनलाईन वेबिनारचें आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे संचालन डॉ.विजय जाधव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यशाळेचा समारोप झाला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे