आयुष्मान भारत ई-कार्डसाठी लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्रात नोंदणी करावी



आयुष्मान भारत ई-कार्डसाठी लाभार्थ्यांनी

आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्रात नोंदणी करावी

·        1209 आजारावरील उपचार व शस्त्रक्रीया मोफत

·        26 हजार 398 लाभार्थ्यांवर 66 कोटी 41 लक्ष रुपये खर्च


       वाशिम, दि. 28 (जिमाका) : सन 2011 च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्व्हेक्षणातून जिल्हयातील लाभार्थ्यांची जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हयात या योजनेसाठी 4 लक्ष 45 हजार 671 लाभार्थी पात्र ठरले आहे. 23 सप्टेंबर 2018 पासून आजपर्यंत 1 लक्ष 30 हजार 416 लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे ई-कार्ड/गोल्डन कार्ड काढले आहे. कोविडमुळे दोन वर्ष या योजनेत लाभार्थ्यांचा सहभाग कमी होता. उर्वरीत 3 लक्ष 15 हजार 255 लाभार्थ्यांचे ई-कार्ड काढणे बाकी आहे. जिल्हयातील 1041 सीएससी केंद्र आणि 353 आपले सरकार सेवा केंद्रातून हे ई-कार्ड/गोल्डन कार्ड काढण्याची मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. तरी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन मोफत स्वरुपात ई-कार्ड/ गोल्डन कार्ड काढून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

          आयुष्मान भारत ई-कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांने त्यांच्याकडे असलेले आयुष्मान भारत पत्र, रेशनकार्ड व आधारकार्ड हे कागदपत्रे घेऊन जवळच्या सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे. स्वत:चा मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा. त्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला दयावा. म्हणजेच ई-कार्ड त्वरीत तयार होऊन उपलब्ध होईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कोणत्याही सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्राकडून लाभार्थ्याला पैशाची मागणी केल्यास त्याची तक्रार तहसिल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे करावे. तक्रारीत सत्यता दिसून आल्यास संबंधित केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल.

          जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध आजारावर उपचार व शस्त्रक्रीयांसाठी जिल्हयातील बिबेकर हॉस्पीटल, देवळे हॉस्पीटल, बाहेती हॉस्पीटल, कानडे हॉस्पीटल, वोरा हॉस्पीटल, लाईफलाईन हॉस्पीटल, वाशिम क्रिटीकल केअर सेंटर, गजानन चिल्ड्रेन हॉस्पीटल, श्री गजानन बाल रुग्णालय, मालेगांव या खाजगी रुग्णालयासोबत वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे.

         आयुष्मान भारतचे ई-कार्ड/ गोल्डन कार्ड काढल्यास विविध 1209 प्रकारच्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रीया पात्र लाभार्थ्यांची मोफत करण्यात येते. जिल्हयातील 26 हजार 398 लाभार्थी रुग्णांच्या जन आरोग्य योजनेतून उपचार व शस्त्रक्रीया मोफत करण्यात आल्या आहे. त्यांच्यावर या योजनेतून 66 कोटी 41 लक्ष 94 हजार रुपये खर्च करण्यात आला. प्रत्येक कुटूंबाला प्रत्येक वर्षी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लक्ष रुपयापर्यंतचे वैद्यकीय संरक्षण मिळते. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 आजारांचा समावेश आहे. या योजनेत प्रत्येक कुटूंबाला प्रत्येक वर्षी 1 लक्ष 50 हजार रुपयापर्यंतचे वैद्यकीय संरक्षण मिळते. मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 2 लक्ष 50 हजार रुपयांची तरतूद केली आहे. तरी ज्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आयुष्मान भारत ई-कार्ड/गोल्डन कार्ड काढलेले नाही, त्यांनी जवळच्या सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन हे कार्ड काढावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

                                                                                                                                     *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे