28 सप्टेंबरला विधाता येथे निर्यात संमेलन
- Get link
- X
- Other Apps
28 सप्टेंबरला विधाता येथे
निर्यात संमेलन
वाशिम, दि. 26 (जिमाका) : जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्हयात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, एक जिल्हा एक उत्पादनाला जिल्हयात चालना मिळावी. तसेच जिल्हयात उत्पादित वस्तूंची मोठया प्रमाणात निर्यात करण्याच्या अनुषंगाने जिल्हा उद्योग केंद्र आणि लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया अर्थात सिडबीच्या संयुक्त वतीने 28 सप्टेंबर रोजी वाशिम नगर परिषदेजवळील विधात सभागृह येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उदघाटन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे करतील.
या संमेलनात कृषी क्षेत्रातील निर्यात संधी, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाच्या योजना, तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे यासह अन्य विषयावर तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे नागपूर येथील सहाय्यक संचालक डॉ. मनिष मोंढे, अमरावतीचे कृषी सहसंचालक के.एस. मुळे, कृषी विभाग, वाशिमचे उपसंचालक निलेश ठोंबरे, संकेत रहाटिया, माधव चाकोलकर, सिडबीचे औरंगाबाद येथील सहायक महाव्यवस्थापक भगवान चंदानी, मैत्री मुंबईचे नोडल अधिकारी पी.पी. मुंढे, विकास आणि कौशल्य विभागाचे प्रतिक बारहाते, भारतीय स्टेट बँक वाशिमचे व्यवस्थापक स्वप्नील तभाने, भारतीय स्टेट बँक वाशिमचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष नाईक हे विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.बी. खंबायत यांनी दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment