राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा दरम्यान ज्येष्ठ नागरीकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर



राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा दरम्यान

ज्येष्ठ नागरीकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 

       वाशिम, दि. 19 (जिमाका) : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने या पंधरवडा दरम्यान जिल्हयातील नर्सिंग महाविद्यालय व आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिटयुट येथे ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता रिसोड तालुक्यातील देगांव येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिटयुट येथे, 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राजर्षी शाहु नसींग महाविद्यालय, वाशिम येथे जागतिक स्मृतीभ्रंश दिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांबाबत व्याख्यान कार्यक्रम व विशेष कार्य केलेल्या जेष्टांचा सत्कार व गौरव कार्यक्रम, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वाशिम येथील आय.यु.डी.पी. कॉलनी, गजानन महाराज मंदिराजवळील सावित्रीबाई नर्सिंग महाविद्यालय येथे, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता वाशिम येथील नॅझरिन नर्सिंग महाविद्यालय येथे, 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वाशिम येथील शिवशक्ती नर्सिंग महाविद्यालय येथे आणि वाशिम येथील मानसी नर्सिंग महाविद्यालय येथे दुपारी 2 वाजता ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, मारोती वाठ यांनी केले आहे.     

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे