जांभरुन (महाली) येथील शाळेत तंबाखूच्या दूष्परिणामावर कार्यक्रम संपन्न

जांभरुन (महाली) येथील शाळेत तंबाखूच्या दूष्परिणामावर कार्यक्रम संपन्न.

वाशिम,दि.१४ (जिमाका) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअतंर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जि.प. वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा जांभरून (महाली) येथे १३ सप्टेंबर रोजी तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.बी राऊत होते.प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विजय काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
           श्री.राऊत यांनी उपस्थित विद्यार्थाना तंबाखूचे व्यसन किती घातक आहे, त्याच्या सेवनाने कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊन
परीणामी आयुष्य उध्वस्त होऊ शकते, त्यामुळे या व्यसनापासुन विद्यार्थानी दुर राहावे.असे आवाहन केले.
       मुख कर्करोगाची लक्षणे तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन कसे सोडवावे याबाबतची माहिती दिली.तंबाखूमुक्तीकरीता टोल फ्रि क्रमांक १८००११२३५६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करून मानसशास्त्रज्ञ राम सरसकटे यांनी मार्गदर्शन केले.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परीणामाबाबत तसेच तंबाखूजन्य पदार्थामुळे होणारे विविध आजार, तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा-२००३) व तंबाखू
मुक्त शाळा याबाबत सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरीता शाळेचे शिक्षकवृंद जी.एम महाले, एम.एस. चौधरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे