पंतप्रधान किसान सन्मान योजना : पात्र लाभार्थ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा ३० सप्टेंबरपर्यंत लाभ घ्यावा
पंतप्रधान किसान सन्मान योजना :
पात्र लाभार्थ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा ३० सप्टेंबरपर्यंत लाभ घ्यावा
वाशिम,दि.१५ (जिमाका) पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे.ही मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही त्यांना नवीन किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे.ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट आहे, त्यांना आवश्यकतेनुसार मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव कर्ज मर्यादा मंजूर करण्यात येणार आहे.ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असून ते अक्रियाशील आहे ते कार्ड क्रियाशील करून देण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील ज्या लाभार्थी लाभार्थ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आपल्या बँक शाखेशी त्वरीत संपर्क करून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून घ्यावे.या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना बँकेच्या निकषानुसार कर्ज वाटपाचा लाभ घ्यावा.असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डी.एच.राठोड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment