शिवशक्ती परिचारीका विद्यालयात 50 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी
- Get link
- X
- Other Apps
शिवशक्ती परिचारीका विद्यालयात
50 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी
वाशिम, दि.२३ (जिमाका) : वाशिम येथील शिवशक्ती परिचारीका विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन 23 सप्टेंबर रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरीक श्रीमती सिंधुबाई सरनाईक, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण कार्यालयाचे निरीक्षक आर. ए. शिरभाते, श्रीमती एस. पी. देखणे, श्री. आर. टी. चव्हाण, शिवशवती परिचारीका विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशिष तायडे, प्रशिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित जेष्ठ नागरिक श्रीमती सिंधुबाई भिमराव सरनाईक यांची प्रथम आरोग्य तपासणी करून करण्यात आली. उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडातील कॅल्शीयम तसेच इतर आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये एकुण ५० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून डॉक्टरांनी योग्य तो सल्ला दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित असलेले डॉ. विश्वजीत गोरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना उदभवणाऱ्या विविध आजारांबाबत तसेच त्यावरील उपचाराबाबत मार्गदर्शन केले. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, यांच्या मार्गदर्शनात समाज कल्याण निरीक्षक आर. ए. शिरभाते, श्रीमती संध्या देखणे, श्री आर. टी. चव्हाण व शिवशक्ती परिचारीका विद्यालय, वाशिम येथील प्रशिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment