8 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
- Get link
- X
- Other Apps
8 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यात 26 सप्टेंबर रोजी नवदुर्गा उत्सवास सुरुवात होणर आहे. स्थापन झालेल्या नवदुर्गा मुर्तीचे 6 व 7 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. नवदुर्गा उत्सवाच्या काळात 5 ऑक्टोबर रोजी दसरा सण व धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. मागील दोन वर्ष कोविड-19 संसर्गामुळे नवदुर्गा उत्सव सार्वजनिक साजरा करण्यात आला नाही. यावर्षी मोठया उत्साहात नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत जैन धर्मियांचे आचार्य श्री. विद्यासागरजी महाराज हे शिरपूर (जैन) येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्यास आहे. शिरपूर (जैन) येथे चातुर्मासाच्या काळात विविध धार्मीक कार्यक्रम व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. याकरीता मोठया प्रमाणात जैन धर्मीय भाविक शिरपूर येथे येत आहे. जिल्हा सण-उत्सवाच्या दृष्टिने संवेदनशील आहे. सण उत्सवाच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी 24 सप्टेंबरपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment