निर्यात क्षेत्रातील संधीबाबत संमेलनातून तज्ञांनी केले मार्गदर्शन



निर्यात क्षेत्रातील संधीबाबत

संमेलनातून तज्ञांनी केले मार्गदर्शन

       वाशिम, दि. 30 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उद्योग संचालनालय व सिडबी उद्योजकता विकास केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने नुकतेच विधाता प्रशिक्षण केंद्र, वाशिम येथे निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात निर्यातदार व निर्यात क्षेत्राशी संबंधित तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निर्यात क्षेत्रातील संधीचा लाभ घेवून जिल्हयातील उद्योजक, व्यावसायीक, शेतकरी व उत्पादक कंपनी यांनी आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

           संमेलनाचे उदघाटन सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.डी. खंबायत, उद्योग निरीक्षक के.ए. शेख,  केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाचे नागपूर येथील सहायक संचालक डॉ. मनिष मोंढे, वाशिमचे कृषी विभागाचे उपसंचालक निलेश ठोंबरे, भारतीय स्टेट बँकेचे मुख्य अधिकारी स्वप्नील तभाणे, आशुतोष नाईक, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर, जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांची उपस्थिती होती.

          श्री. खंबायत यांनी निर्यात संमेलनाच्या आयोजना मागचा हेतू विशद केला. जिल्हयात उद्योजकांना निर्यात क्षेत्रातील संधीची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या, नियम व अटी याविषयी श्री. खंबायत यांनी माहिती दिली.

           डॉ. मोंढे यांनी लहान मोठया शेतकरी समुह गटाच्या माध्यमातून तसेच विविध स्लाईडसच्या माध्यमातून युरोप, मध्यपूर्व देश, आफ्रिकन देश व शेजारच्या देशांना कशाप्रकारे निर्यात करता येईल तसेच नाशिक येथील सहयाद्री फार्मर्स प्रोडयुसर्स कंपनी व त्यांचे कामकाजाविषयी देखील उपस्थितांना माहिती दिली.

           बँक व नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी निर्यातक्षम व्यवसायास बँकांकडून आर्थिक सहाय्य योजनांविषयी माहिती दिली. उपस्थितांनी निर्यात धोरणाविषयी प्रश्न विचारुन तज्ञांकडून पुरक माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार उद्योग निरीक्षक के.ए. शेख यांनी मानले.      

                                                                                                                                       *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे