सेवा पंधरवडानिमित्त जात प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी व प्राचार्यांचे प्रशिक्षण संपन्न

सेवा पंधरवडानिमित्त

जात प्रमाणपत्र देण्यासाठी
उपविभागीय अधिकारी व प्राचार्यांचे प्रशिक्षण संपन्न

वाशिम,दि.२०(जिमाका) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने १७ सप्टेंबर  ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.या पंधरवड्याचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय,वाशिमच्या वतीने विविध कार्यक्रम,कार्यशाळा मार्गदर्शन व जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे.आज २० सप्टेंबर रोजी  जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिका-यांसाठी जात प्रमाणपत्र वाटप करताना घ्यावयाची दक्षता व त्यातील महत्वाच्या बाबीवर एक दिवसाचे
प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. 
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत हे उपस्थित होते.या प्रशिक्षणासाठी वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत व मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उपस्थित होते.  
         प्रशिक्षण वर्गात जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.श्री.राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
      जिल्ह्यातील कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे सुध्दा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी प्राचार्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली.मोहन तिडके यांनी जात वैधता प्रस्तावावर सादरीकरण केले.याप्रसंगी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी मारोती वाठ यांनीही मार्गदर्शन केले. 
         प्रशिक्षण वर्गाचे संचालन अॅड.किरण राऊत यांनी केले.  आभार निलेश चव्हाण यांनी मानले.      
कार्यक्रम यशस्वीतेसाठी  वैभव घुगे, पंकज ठाकूर, कविता पुर्णे,राम काष्टे व संजय ठाकूर आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे