खासदार भावना गवळी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अनुदान धनादेशाचे वितरण
- Get link
- X
- Other Apps
खासदार भावना गवळी यांच्या हस्ते
लाभार्थ्यांना अनुदान धनादेशाचे वितरण
वाशिम, दि.२३ (जिमाका) : खासदार भावना गवळी यांच्या हस्ते आज 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात स्व. गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभार्थ्यांच्या वारसास प्रत्येकी 2 लक्ष रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये मालेगांव तालुक्यातील सुकंडा येथील प्रियंका खिल्लारे व मंगरुळपीर तालुक्यातील कंझारा येथील प्रभाकर वावगे यांना हे धनादेश वितरीत करण्यात आले.
सन 2022-23 या वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत मळणी यंत्राच्या अनुदानाचे वाटप वाशिम तालुक्यातील काशिराम कवर, काजळंबा येथील राजाराम सोनटक्के यांना पेरणीयंत्र अनुदानाचे वाटप, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जुमडा येथील शेतकरी गजानन शिंदे यांना ट्रॅक्टर अनुदानाचे वाटप, राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत केकतउमरा येथील शेतकरी परसराम हरिमकर यांना मिनी दालमिल अनुदानाचे वाटप, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य योजनेअंतर्गत सावळी येथील लाभार्थी पंचशिला इंगोले यांना पेरणी यंत्राच्या अनुदानाचे वाटप आणि राष्ट्रीय पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत काटा येथील शेतकरी शंकर निंबलकर यांना रोटाव्हेटर अनुदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम., जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment