सेवा पंधरवडा दरम्यान शिबीरातून शिष्यवृत्ती प्रस्तावांचे संकलन
सेवा पंधरवडा दरम्यान
शिबीरातून शिष्यवृत्ती प्रस्तावांचे संकलन
वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी करीता पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वीच्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती संवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, इयत्ता 9 वी व 10 वी च्या अनुसूचित जातीच्या मुलांना भारत सरकार शिष्यवृत्ती, 10 परीक्षा फी/ गुणवत्ता शिष्यवृत्ती/ विद्यावेतन/ डिएनटी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती/ 1 ली ते 10 वी च्या इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती या शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 मध्ये ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या निमित्ताने या शिष्यवृत्ती प्रस्तावांच्या संकलनासाठी समाज कल्याण विभागामार्फत शिबीराचे आयोजन करण्यात आले असून मोठया प्रमाणात प्रस्ताव संकलीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी दिली.
*******
Comments
Post a Comment