आदिवासी विद्यार्थ्यांचे महाडिबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज मागविले



आदिवासी विद्यार्थ्यांचे

महाडिबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज मागविले

       वाशिम, दि. 26 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला अंतर्गत भारत सरकार शिष्यवृती अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र 2022-23 या वर्षाचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahadbtmahait.gov.in ही प्रणाली 21 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. शासनस्तरावरुन या प्रणालीवर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे निर्देश दिले आहे.

       जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर योजनेचे सन 2022-23 या सत्रातील नविन तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ mahadbtmahait.gov.in या प्रणालीवर ऑनलाईन भरावे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सन 2021 -22 व 2022-23 या वर्षातील महाविद्यालयस्तरावरील विविध कारणास्तव प्रलंबित असलेले अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे नविन अर्ज तसेच नुतनीकरण अर्ज तात्काळ त्रृटी पुर्तता करून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला या कार्यालयाच्या लॉगीनला मंजूरीसाठी पाठविण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांच्या अर्जाची हॉर्ड कॉपी महाविद्यालयस्तरावर जतन करून ठेवावी.

           अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज भरून महाविद्यालयस्तरावर सादर करावे. यासाठी महाविद्यालयात सुचना फलकावर सुचना लावून वर्गामध्ये नोटीसबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे. अनुसूचित जमातीचा विद्यार्थी हा भारत सरकार शिष्यवृती व इतर योजनांपासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही महाविद्यालयाची राहिल. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे