अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या 9 आदर्श वस्त्यांची घोषणा



अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या

9 आदर्श वस्त्यांची घोषणा

       वाशिम, दि. 30 (जिमाका) : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या आदर्श वस्ती घोषीत करण्याबाबत समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नागमोरे यांनी सूचना दिल्या आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील वाशिम तालुक्यातील टणका, सुपखेला, मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ, कारंजा तालुक्यातील दिघी, दुघोरा व धनज (बु.), मानोरा तालुक्यातील सोमठाणा, आमगव्हाण, धानोरा (बु.) इत्यादी गावातील वस्त्या आदर्श वस्त्या म्हणून घोषीत करण्यात आल्या आहे. 

        अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये पाणी पुरवठयाची कामे, मलनि:सारण, गटार बांधणे, रस्ते, पोच रस्ते, पावसाच्या पाण्याचा निचरा करणे, वीज पुरवठा, पेवर रस्ता व समाज मंदिर बांधणे इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण करुन त्यांच्या सर्वांगीण विकासाची कामे करण्यात येतात.

                                                                                                                                     *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे