शिष्यवृती योजना ऑफलाईन 2 ऑक्टोबरपर्यंत अर्ज संकलीत करावे
- Get link
- X
- Other Apps
शिष्यवृती योजना ऑफलाईन
2 ऑक्टोबरपर्यंत अर्ज संकलीत करावे
वाशिम, दि. 26 (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी करीता पुर्व शिष्यवृती अंतर्गत 1 ली ते 10 वीच्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती या संवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृती, इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या अनुसूचित जातीच्या मुलांना भारत सरकार शिष्यवृती तसेच इयत्ता 10 वी परीक्षा फी, गुणवत्ता शिष्यवृती, विद्यावेतन, डीएनटी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृती, इयत्ता 1 ली ते 10 वीच्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृती या शिष्यवृती योजना सन 2022-23 या वर्षात ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. तरी सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांचे अर्ज संपूर्ण आवश्यक कागदपत्रांसह 2 ऑक्टोबरपर्यंत संकलीत करावे. विद्यार्थी शिष्यवृतीच्या लाभापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घ्यावी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचा लाभ देण्यात यावा. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment