जिल्हा रुग्णालय येथे १७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर
जिल्हा रुग्णालय येथे १७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर
वाशिम,दि.१४ (जिमाका) भारत सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी,महाविद्यालयातील विद्यार्थी, अशासकीय संस्था व सामाजिक संस्थानी आयोजित रक्तदान शिबीरात सहभाग घ्यावा.असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे यांनी केले आहे.
या रक्तदान मोहिमेचे घोषवाक्य “ रक्तदान हे एकजुटीचे कार्य आहे.या प्रयत्नात सामील व्हा आणि जीव वाचवा " असे आहे. या मोहिमेत अशासकीय रक्तसंकलन केंद्रानी सुद्धा भाग घ्यायचा आहे.
रक्तदान करणाऱ्या सर्व ईच्छुक रक्तदात्यांना अशासकीय तसेच रक्तदान शिबीर आयोजकांना रक्तदान शिबीर घेण्याची सोय Online पद्धतीने “आरोग्य सेतु अॅप” तसेच "Raktkosh” या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे.ही मोहीम १ ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच " राष्ट्रीय स्वैच्छा रक्तदान दिवस " पर्यत सुरु असणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी तसेच रक्तदान शिबीर आयोजकांनी नोंदणी करून रक्तदान करावे.असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे यांनी केले आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यास काही अडचण व शंका असल्यास सचिन दंडे (8459461032) यांचेशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment