एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न

वाशिम दि.१(जिमाका) वाशिम तालुक्यातील इलखी येथे आज १ सप्टेंबर रोजी " एक दिवस माझ्या बळीराजासाठी " या उपक्रमाअंतर्गत चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी संशोधन केंद्र वाशिमचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गीते,तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ,तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ,कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे,मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड,श्री.चवरे,कृषी सहायक महादेव सोळंके व सुनील गोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
          मंगरूळपीर तालुक्यातील चिंचाळा येथील या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले,मंडळ अधिकारी आकाश इंगोले, कृषी पर्यवेक्षक साकेत लांडे,कृषी सहायक सतिश राऊत लक्ष्मण राऊत ,गंगाराम कलापड व इतर शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
       कारंजा तालुक्यातील दुर्गम गाव असलेल्या रामटेक येथे बळीराजा यांचे सोबत संपूर्ण दिवस राहून त्यांना प्रत्यक्षात येणाऱ्या विविध अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी श्री.पडघन, तालुका कृषी अधिकारी श्री. चौधरी,मंडळ कृषी अधिकारी श्री जटाळे,पंचायत समिती कृषी अधिकारी श्री राठोड,सरपंच श्री.भेंडे, कृषी पर्यवेक्षक श्री.अर्बट,श्री.ठाकरे, कृषी सहाय्यक सीमा पवार,महिला बचत गटाच्या सदस्य आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे