माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी रिसोड तालुक्यातील असोला येथे कार्यक्रम संपन्न

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी 
 
रिसोड तालुक्यातील असोला येथे कार्यक्रम संपन्न  

वाशिम दि.०१(जिमाका) रिसोड तालुक्यातील आसोला येथे आज १ सप्टेंबर रोजी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप ,नायब तहसीलदार श्री.नपते,मंडळ कृषी अधिकारी श्री. थोरात, सरपंच. श्रीमती पाचरणे , पोलीस उपनिरीक्षक , कनिष्ठ अभियंता महावितरण , प्रगतिशील शेतकरी संतोष घायाळ , भानुदास पाचरणे ,ग्रामसेवक श्रीमती उषा साठे ,तलाठी श्री धांडे ,कृषी सहाय्यक श्रीमती कांबळे, श्री. कायंदे श्री शिंदे श्री खाडे उपस्थित होते.    
             या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अडचणींविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले व अष्टसुत्रीचा वापर करून उत्पादन वाढ करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी पोकरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेततळी व शेडनेटसाठी अर्ज करून घेण्यात आले. महिला बचत गटांना पीएमएफएमइ योजनेअंतर्गत अर्ज करून घेण्यात आले.कार्यक्रमाला आसोला व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे